Cultural activit

Dance - nrutya

           Dr Sudha had made a world record by giving a continuous Bharatnatyam performance from sunrise to sunset (12 hours) Dr Sudha is devoted Indian classical dancer Bharatnatyam and Kuchipudi style. She has performed nonstop 12hrs dancing and creates a history in the world. She has awarded for this with “Nrtya-Tilaka” Award, and Bramhi-Sundari” Award with the hands of famous member of parliament Jayaprada. She conducts many workshops and competition to promote drama activity for school students “Kankaria Karandak” Dr. Sudha is also a writer and poet, she wrote around 15 books on various subjects she was president of Sahitya Parishad, and also she is poet. Her poems are very much famous in society. One of the poem on “Mother” is nominated for the Genius Book.


Nrityatilaka Award

            अहमदनगर येथील सुप्रसिध्द नेत्रतज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या डॉ सुधा कांकरिया यांनी १० आक्टोबर १९९८ रोजी सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत अखंड १२ तास कुचीपुडी नृत्य आविष्कार-नृत्य आराधना सादर करून एक विश्वविक्रम केला. तत्कालीन खासदार नृत्यांगना, सिनेअभिनेत्री जयाप्रदा साक्षीला होत्या. त्यांच्याच हस्ते डॉ. सुधा यांना नृत्यतिलका ही पदवी बहाल करण्यात आली तर भारतीय नृत्य प्रतिष्ठान तिरूपती यांच्या वतीने ताम्रपट प्रदान करण्यात आला. नगरकरांनी एक आगळया वेगळया भारतीय नृत्यशैलीचा आविष्कार याची देही याची डोळा पाहिला. एक डॉक्टर असूनही नृत्यातील त्यांची अचुक व वैशिष्यपूर्ण अदाकारी प्रेक्षकांना भावून गेली. अहमदनगरच्या सांस्कृतिक वैभवात त्यामुळे नक्कीच भर पडली. त्यानंतर डॉ. सुधा यांनी अनेक धार्मिक, वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक व्यासपीठावरून आपली बहारदार नृत्य सादर करून वाहवा मिळवली. पोलिओ निर्मूलन व बेटी बचाओ या अभियानाच्या प्रचारासाठी ही त्यांनी आपल्या नृत्य आविष्काराचा सद्उपयोग महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केला ही अभिनंदनीय बाब आहे. देशभक्तीची भावना दृढ होण्यासाठी त्यांनी नृत्यातुन प्रबोधन केले. अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या डॉ. सुधा कांकरिया यांचे मन:पूर्वक अभिनंदन!

KANKARIA KARANDAK

कांकरिया करंडक - रौप्य महोत्सवी वर्ष 
बालरंगभूमी वरील २ तपांची तपश्चर्या

         बालरंगभूमी ही निखळ आनंद देणारी हसत खेळत नकळतपणे सुसंस्कार करणारी पाठशाळा आहे. बालनाटयाच्या विश्वात चिमुकले सवंगडी इतके समरस होतात की, संस्कार कधी झाले हे समजतच नाहीत. इथे मनोरंजनातून संस्कार घडतात. बालरंगभूमी ही माणूस घडविणारी व संस्कृती फुलविणारी प्रयोगशाळा आहे असे मला वाटते

माझे सासरे, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी न्यायमूर्ती स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया यांच्या नावाने कांकरिया करंडक अर्थात राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव (स्पर्धा) मानकन्हैय्या ट्रस्ट व मराठवाडा मित्रमंडळ द्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. यंदा त्याचे २५ वे वर्ष आहे.

           या २५ वर्षात ५०० पेक्षा जास्त संघ, ८ हजारापेक्षा अधिक बालकलाकार सहभागी झाले. अनेक परिक्षक यानिमित्ताने स्नेह धाग्यात गुंफले गेले. अनेक मान्यवर पाहुण्यांचे-तज्ञांचे आशिर्वाद, मार्गदर्शन लाभले. हजारो प्रेक्षकांना अलौकिक असा आनंद प्राप्त झाला. कलेच्या या अभिव्यक्तीमुळे  अनेक अनेक बालकलाकार घडत गेले. एकांकिका ते चित्रपट, अभिनय ते दिग्दर्शन असा ही काहींचा प्रवास झाला. सहभागी सर्वांचेच मी या निमित्ताने अभिनंदन करते.

          जय मल्हारचा रोहित देशमुख, अल्टी पल्टी मधील चैतन्य सरदेशपांडे, तसेच पुष्कर तांबोळी, अमित रेखी, वैष्णवी घोडके, क्षितीज पटवर्धन आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये आपला ठसा उमटवणारा शाम राजपुत, बिग बॉस  मधील सई लोकुर, तसेच व पक पक पकाक व दे धक्का मधील सक्षम कुलकर्णी, अश्वीन चितळे, पद्मनाभ गायकवाड, गौरवी जोशी, चित्रपट निर्माता स्वप्नील मुनोत, सुप्रसिध्द गायिका प्रियंका बर्वे, चित्रपट निर्माता दिग्दर्शक  दिगपाल लांजेकर, दिग्दर्शक व अभिनेता सुरज पारसनीस, अभिनेता व लेखक ओंकार गोखले, टि व्हि मालिकांचा पटकथा लेखक शार्दूल सराफ, तुमच्यासाठी काय पण या वेबसिरीजचा दिग्दर्शक स्वप्नील शशिकांत नजान, झी मराठी सा रे ग म प मधील अंजली व नंदिनी गायकवाड हे व असे अनेक हिरे कांकरिया करंडकाने नाटय-चित्रपट सृष्टीला बहाल केले. तसेच आदरणीय डॉ. लक्ष्मण देशपांडे (वर्‍हाड कार), श्री नागनाथजी फटाले (जेष्ठ पत्रकार), श्री द मा मिरासदार (अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन), श्री चंद्रकांत कुलकर्णी, प्रा जयंत तारे (बाल नाटय चळवळीचे जेष्ठ अभ्यासक), सौ आशालता वाबगावकर (सिनेअभिनेत्री), डॉ. निशिगंधा वाड (सिनेअभिनेत्री), श्री विश्वासराव नांगरे पाटील (जिल्हा पोलिस अधिक्षक), श्री चित्तरंजन कोल्हटकर (जेष्ठ रंगकर्मी), श्री दत्ताजी भगत (अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य संमेलन), अतूल तोडनकर (अभिनेता), श्रुती कार्लेकर, श्री महेश सावंत, नाटय क्षेत्रातील थोर व्यक्ती श्री कमलाकर सोनटक्के, सौ कांचन सोनटक्के, विणा लोकुर, टिव्ही स्टार मोहिनीराज गटणे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून ठोस भुमिका बजावली, बालकलाकारांना मार्गदर्शन केले. कौतुकाची थाप पाठीवर ठेवली.

              मराठी रंगभूमीचा बालरंगभूमी हा पाया आहे. महाराष्ट्राची मराठी बालरंगभूमी अधिक समृध्द व्हावी म्हणून बालनाटय चळवळीला गती देण्याचे कार्य कांकरिया करंडकाने केले. नाटयसंस्कार, ज्ञान, विचार, दूरदृष्टी आणि सेवाभाव या पंचमार्गावरून चाललेली कांकरिया करंडक  राज्यस्तरीय बाल एकांकिका स्पर्धा ही अहमदनगर शहराला महाराष्ट्राला आणि बालरंगभूमीला नक्कीच भूषणावह ठरली आहे. राज्यस्तरावर कार्य करणारी व बालरंगभुमीला समर्पित तसेच अखंड २५ वर्षे कार्य करणारी कांकरिया करंडक ही एकमेव स्पर्धा आहे.

              कांकरिया करंडकाच्या प्रदिर्घ २५ वर्षाच्या अनुभवावरून मला असे वाटते की, जसा जसा बालकलाकार बालरंगभूमीशी जवळीक साधू लागतो तसा तसा त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होतो, त्याला सभाधीटपणा येतो. स्वत:चे विचार व भावना प्रभाविपणे प्रगट करण्याचे कौशल्य त्याच्यात निर्माण होते. त्याचे कल्पनाविश्व विस्तारते. नाटक एकटयाचे नसते ते अनेकांना सोबत घेऊन करावे लागते. त्यामुळे इतरांसोबत राहणे, सर्वांच्या भावनांचा विचार करणे, एकमेकांना सांभाळून घेणे, एकमेकांच्या सुख दु:खात समरस होणे, ह्या संघवृत्ती निर्माण करणार्‍या चांगल्या गुणांचीही जोपासना इथे आपोआपच होते. तसेच नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा वगैरे मधून चित्रकला-रंग-आकृतीचे संस्कार घडतात. म्हणूनच माझा आग्रह असेल की बालनाटय हे एक पाठपुस्तकाचा भाग असायला हवा.

              कांकरिया करंडकाच्या २५ वर्षे अर्थात दोन तपाच्या यशस्वी तपस्याचे मानकरी आहेत कांकरिया करंडकाच्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया तसेच मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश व कार्याध्यक्ष डॉ. वर्धमान कांकरिया, सचिव श्री सदाशिव मोहिते, श्री उमाकांत जांभळे, श्री सुभाष बागुल, श्री दत्ता इंगळे, मोईनुद्दीन ईनामदार, श्री सौदागर मोहिते, कु प्रिया सोनटक्के, प्राची जांभळे, श्री शशीकांत नजान आणि असंख्य कार्यकर्ते! यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष अत्यंत दिमाखदार साजरा करण्यासाठी संपूर्ण कांकरिया करंडकचा परिवार सज्ज झाला आहे.


              लेखिका

      डॉ. सुधा कांकरिया

स्वागताध्यक्षा कांकरिया करंडक 

राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा वर्ष २५ वे

Photo

Read More

Appreciation