Preventive cardiology

जागतिक आरोग्य संघटनांनी केलेल्या व्याख्याप्रमाणे आपल्या शरीरात काही रोग नसणे म्हणजे निरोगी असणे असे नव्हे. तर जेव्हा आपण शारिरीक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक पातळीवर स्वस्थ असू तेव्हाच आपण आरोग्यसंपन्न आहोत असे म्हणता येईल. सध्याची आपली जीवन पध्दती आणि औषध उपचार पध्दती केवळ शारिरीक पातळीवर कार्य करतांना दिसते.

संशोधक असे सांगतात की ८० % पेक्षा जास्त आजार हे मनोकायिक असतात. म्हणजेच कमजोर व अशक्त मनामुळे निर्माण झालेले असतात. वेगवेगळया प्रकारचे ताण तणाव, राग, चिडचिडपणा, एकटेपणा, नैराश्य, जल्दबाजी, प्रेमाचा अभाव, सतत तक्रार करण्याचा स्वभाव, प्रत्येक घटनेकडे नकारात्मक दृष्टीकोनाने पाहण्याची सवय या सर्व नकारात्मक विचार, भावभावना व मानसिक कमजोरीमुळे अनेक आजार होतात. त्यात हृदयविकार अग्रेसर आहे. हृदयविकार होण्याचे ८० % कारण मानसिक प्रदुषण आहे व २० % चुकीची आहार पध्दती व व्यायामाचा अभाव हे आहे. त्यात अनियमित झोप, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोटापा, धुम्रपान, व्यसन, रक्तात वाढलेली कोलेस्टरॉलची पातळी, अनुवांशिकता हे घटक हृदयरोग बळावण्यासाठी कारणीभूत ठरतात यांनाच Risk Factor म्हणतात.

सावधान ! भारतात हृदयविकाराचे रूग्ण वाढत आहेत

२०१५ च्या अहवालाप्रमाणे सुमारे ६२ मिलीयन व्यक्ती भारतात हृदयविकाराचे शिकार झाले आहेत. त्यामधील ३७ मिलीयन व्यक्तींचे वय ५० वर्षापेक्षा कमी आहे. त्यातील २.९ मिलीयन व्यक्ती हृदयरोगामुळे दरवर्षी मृत्यु पावतात. गेल्या काही दशकात जवळपास ३०० % पेक्षा जास्त ह्दयरोगाचे रूग्ण भारतात वाढले आहेत! हे चित्र भयावह आहे. याचा वेळीच बंदोबस्त केला पाहीजे. आता तरी आपण जागृत झाले पाहीजे. (१ मिलीयम म्हणजे १० लाख)

ARH Preventive Cardiology Dept Inaugration 4

Prevention is better than cure रोग होणारच नाही अशी व्यवस्था करू या

) Primary Prevention प्राथमिक व्यवस्था - शालेय महाविदयालयातील विदयार्थांना राजयोगा मेडिटेशन जिवनपध्दती शिकवणे आवश्यक आहे. मेडीटेशन हा त्यांचा दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा. प्रत्येक कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींनी ही जीवनपध्दती अंगिकारली तर आपोआपच मुलांवरही तसेच संस्कार होतील.

) Secondary Prevention - ज्यांना हृदयरोग झालेला आहे त्यांनी औषध उपचारासोबतच राजयोगा मेडिटेशन, सात्विक संतुलित आहार पध्दती तसेच योग्य पध्दतीने व्यायाम करणे आवश्यक आहे.

) Tertiary Prevention - ज्यांना हृदयरोग आहे त्यांचे Angioplasty किंवा Bypass सारखे ऑपरेशनही झाले आहे अशा रूग्णांमध्ये हा हृदयरोग परत उद्भवु शकतो (Recurrence) होऊ शकतो. तो टाळण्यासाठी त्यांनी औषध उपचाराबरोबरच राजयोगा मेडिटेशन जीवन पध्दती, सात्विक संतुलित आहार तसेच योग्य पध्दतीने केलेला व्यायाम अर्थात 3D Health Care Program अंगिकारण्याची आवश्यकता आहे.

* हृदयरोग हा अनुवांशिक रोग असून आई किंवा वडिलांना किंवा दोघांना असेल तर मुलांना होण्याची शक्यता असते. मुलांना होणारा हा हृदयरोग या 3D Health Care Program च्या सहाय्याने टाळता येऊ शकतो.

* राजयोगा मेडिटेशन लाईफ स्टाईलद्वारे केवळ हृदयरोगच नाही तर इतरही रोगाचे निवारण होते. अनियमित झोप, मधुमेह, उच्च रक्तदाब, मोटापा, धुम्रपान, व्यसन, अनुवांशिकता, कॅन्सर या सगळया घटकांवरही राजयोगा मेडिटेशन ने प्रभावी मात करता येते.

Healthy & Happy Life Style - 3 Dimensional Health care Program

) Intense Scientific Information about Heart & Heart diseases, Mind & Heart connection & risk factors

* संपूर्ण वैज्ञानिक माहिती - हृदय, हृदयरोग तसेच मानसिक स्थिती हृदयरोग यांचे नाते आणि हृदयरोग बळवणारे घटक यांनी संपूर्ण वैज्ञानिक माहिती घेणे

) Rajyoga Meditation Life Style - 7 days basic Rajyoga Meditation course & 7 days advance course. Education & counselling about soul & body

* राजयोगा मेडिटेशन बेसीक दिवसाचा कोर्स हृदयाशी निगडित दिवसाचा कोर्स सोबतच कॉन्सीलींग तसेच दैनंदिन आनंदी जीवनाचे रहस्य यांचा अभ्यास

) Proper information about diet, excercise, sleep management & usual medical care.

* सात्विक संतुलीत आहार, नियमित शास्त्रशुध्द व्यायाम, झोपेचे व्यवस्थापन औषधे वगैरेची माहिती घेणे.

Four Principles of Prevention हृदयरोग टाळण्यासाठी चार तत्वे

Healing is a dynamic process of harmony in flow of spiritual, mental and physical energy.

1) Healthy - Self responsibility through self empowerment Heal yourself

स्वस्थ - स्व (-आत्मा) मध्ये अर्थात आत्मिक गुणांमध्ये स्थित होणे.

- स्वत:ची जबाबदारी स्वत: घेणे.

) Self Awareness - Soul Consciousness आत्मिक स्थितीचा अभ्यास करणे. स्वत:च्या आरोग्या विषयी जागृत राहून, नियमांचे पालन करणे.

) 3 D Health Care Program वर दिल्या प्रमाणे

) Biological Clock : Cerium Rhythm जैविक घडयाळाप्रमाणे दैनंदिन जीवनात बदल करून जीवन सहज सुंदर बनविणे.

Video gallery

महानगर न्यूज - आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये ह्दयाशी संबंधित

प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी विभाग सुरु

Peace News - Preventive Cardiology Department Inauguration

CME on Stress, Health and Preventive Cardiology at ARH Preventive Cardiology Department